Pan Card Apply Online 2022 | आधार कार्डवरून पॅन कार्ड कसे काढायचे?

pan card apply online | Pan card download | online pan card | ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे ।pan card application form | e-pan card | Income Tax pan card |

Pan Card Apply Online 2022

ज्यांनी अद्याप त्यांचे पॅनकार्ड बनविलेले नाही, ते त्यांचे पॅनकार्ड घरी बसून बनवू शकतात, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आणि १५ दिवसांच्या आत तुमचे पॅन कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

आपल्याला कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा असेल किंवा बँक खाते उघडण्यासाठी व प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कामात Pan Card क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. तसेच 50000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रक्कम बँक मध्ये भरायची असेल पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही कुठेही 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी करत असाल तर तुम्हाला तुमचे पॅनकार्ड दाखवावे लागेल. अगोदर पॅन कार्ड काढणे म्हणजे फार वेळ त्यासाठी लागत असायचा. लोकांची ही गरज लक्षात घेऊन सरकारने केवळ आधार क्रमांकाच्या मदतीने 10 मिनिटांत मोफत तत्काळ ई-पॅन (e-pan) कार्ड जारी करण्याची आणि डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. आपण या लेखात आपण आधार कार्डच्या मदतीने Online Pan Card कसे बनवायचे .

पॅन कार्ड म्हणजे काय?

PAN म्हणजे परमनंट अकाउंट नंबर ( Permanent Account Number). . PAN हा आयकर विभागाने जारी केलेला दहा-अंकी अद्वितीय अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. तुम्ही आधार कार्ड द्वारे अर्ज केल्यास तुम्हाला आज 10 मिनिटांमध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड मिळते.

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • मूळ पत्ता पुरावा
  • वैयक्तिक ओळखपत्र ( फोटो ओळखपत्र जे केंद्र सरकार असेल )
  • ईमेल आयडी (अनिवार्य)
  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक
  • पासपोर्ट आकार 2 फोटो

पॅन कार्डचे फायदे:

  • आयकर रिटर्न भरण्यासाठी.
  • जर तुम्ही बँकेतून 50 हजार रुपये काढले किंवा जमा केले तर त्यासाठी तुम्हाला वेगळी कागदपत्रे जोडावी लागणार नाहीत. तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहज पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • त्याचा वापर शेअर्स खरेदी-विक्रीसाठी करता येतो.
  • टीडीएस जमा करण्यासाठी आणि परत मिळविण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
  • पॅन कार्ड च्या मदतीने तुम्ही बँकेत तुमचे खाते सहज उघडू शकता.

पॅन कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करावा? How to apply Pan Card Online?

ज्यांनी आतापर्यंत पण कार्ड बनवले नाही तर त्यांच्यासाठी पॅनकार्ड घरी बसून बनवू शकतात, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आणि 15 दिवसांच्या आत तुमचे पॅन कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

आधार कार्ड वरून 3 प्रकारे पॅन कार्ड बनवता येते :

आधार कार्ड क्रमांकावरून पॅन कार्ड बनवण्याची पद्धत आता खालीलप्रमाणे बघूया.

1) NSDL Pan Card Apply Online :

  • प्रथम NSDL वेबसाइट च्या लिंक ला जाऊन भेट दया https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
  • या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट या वेबसाईट वर येणार तेव्हा खालील प्रमाणे पेज उघडेल.
pan card apply online
  1. या प्रमाणे एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला खालील माहिती भरायची हे.
  2. (वैयक्तिक पॅन कार्ड साठी लागणारी माहिती)
    1. पॅन क्रमांक ( पॅन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर पण नंबर ची आवश्यकता असते )
    2. आधार क्रमांक
    3. जन्मतारीख
    4. ई-मेल आय डी
    5. मोबाइल नंबर
    6. कॅप्चा कोड आणि continue या टॅब वर क्लिक करा.
  • कंपनी किंवा व्यवसाय असेल त्याच्या पॅन कार्ड साठी लागणारी माहिती
    1. पॅन क्रमांक ( पॅन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर पण नंबर ची आवश्यकता असते )
    2. आधार क्रमांक
    3. जन्मतारीख ( कंपनी किंवा व्यवसाय असेल तर त्याची नोंदणी किंवा स्थापनेची तारीख )
    4. ई-मेल आय डी
    5. मोबाइल नंबर
    6. जीएसटी नंबर
    7. कॅप्चा कोड आणि Continue या टॅब वर क्लिक करा.
  • यानंतर खालील प्रमाणे पेज उघडेल आणि Token Number मिळेल यानंतर Continue with Pan Application Form या टॅब वर क्लिक करा.
pan card application form
  • आता पुढे नवीन पेज उघडेल त्यात 3पर्याय देतात.
    • Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless) 
    • Submit scanned images through e-Sign
    • Forward application documents physically  
  • तुम्ही या मध्ये पहिला पर्याय निवडायचा  Submit digitally through e-KYC & e-Sign.    
  • आता तुम्हाला  पुढचा पर्याय असेल PAN CARD हे physical पाहिजे का?
    • yes या बॉक्स वर क्लिक केले तर 101रुपये ऑनलाईन भरावे लागणार. डिजिटल पद्धतीने फॉर्म भरल्यामुळे 101रुपये लागतात हेच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म डाउनलोड करून पाठवला तर तुम्हाला 107रुपये लागणार.
    • No या बॉक्स वर क्लिक केले तर तुम्हाला 66 रुपये भरावे लागराने. हेच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म डाउनलोड करून पाठवला तर तुम्हाला 72रुपये लागणार.
  • आता यानंतर तुम्हाला विचारलेली आवश्यक ती माहिती भरा.आणि NEXT बटण वर क्लीक करा.
  • आता तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली आहे ती दिसेल ती तुम्ही तपास आणि परत NEXT बटण वर क्लीक करा. आता तुमच्या समोर Declaration दिसेल त्या रिक्त जागा भरून submit या बटण वर क्लिक करा.

टीप : जर तुमचा पॅन क्रमांक किंवा दुरुस्ती गेल्या 30 दिवसांत मंजूर झाली असेल, तर तुम्ही ते 3 वेळा विनामूल्य डाउनलोड करू शकता. जर पॅन क्रमांक किंवा त्यात सुधारणा 30 दिवसांपूर्वी मंजूर झाली असेल, तर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.26 रुपये शुल्क देखील भरावे लागेल.

2) UTITSL Pan Card Apply Online :

  • प्रथम UTITSL वेबसाइट च्या लिंक ला जाऊन भेट दया.
  • यानंतर नवीन पेज उघडेल.
  • आता या पेज वर Pan card for indian citizen या बटण वर क्लिक करा. त्या नंतर अजून एक पेज उघडेल new pan card apply Online वर क्लिक करा.
PAN CARD APPLY ONLINE
  • त्या नंतर अजून एक पेज उघडेल apply for new pan card वर क्लिक करा. यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल.
utitsl pan 10 min |
  • आता आता submit वर क्लिक करा आणि जो फॉर्म उघडेल त्यामध्ये सर्व महत्वाची वैयक्तिक माहिती भरा.
  • जी जी माहिती विचारलेली आहे ती भरायची आणि शेवटी हे पेज उघडेल आणि नंतर तुम्हाला Make Payment या बटण वर क्लिक करावे लागेल.
pan card payment
  • अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

3) Income Tax Pan Card Apply Online :

  • आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल . होमपेज च्या डाव्या बाजूला असलेला लिंक्स विभाग आहे . या यादीत (Instant E-Pan) ई-पॅनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
Pan Card Apply Online
  • यानंतर तुमच्या समोर खाली डाव्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये Get New e-PAN चा बॉक्स दिसेल. Get New E-PAN च्या लिंकवर क्लिक करा.
pan card
  • आता नवीन पेज उघडल्यानंतर त्या रिकाम्या बॉक्स मध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका I Confirm that या टॅब वर क्लिक करून continue या टॅब वर क्लिक करावे.
pan card
  • यानंतर ज्या अटी दिल्या आहेत त्या वाचून खाली दिलेल्या रिकाम्या चेकबॉक्सवर खूण करा आणि तुमचे आधार लिंक केलेल्या मोबाईल वर OTP येईल. ६ अंकी ओटीपी समोरील रिक्त बॉक्समध्ये भरा.
  • आता यानंतर खाली दिलेले हे वाक्य वाचा मी UIDAI सोबत माझे आधार तपशील प्रमाणित करण्यास सहमत आहे. तुम्ही एंटर केलेल्या ओटीपीचे यशस्वी प्रमाणीकरण केल्यानंतर, ई-केवायसी आधार डेटाची विनंती UIDAI कडून प्राप्त केली जाईल. यानंतर बॉक्स मध्ये क्लिक करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती (फोटो, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता इ.)तपासा आणि Continue या टॅब वर क्लिक करा
  • जर ई-मेल आयडी आधारमध्ये नोंदणीकृत नसेल, तर ईमेल आयडीच्या पुढे Not linked लिहिलेअसेल.. उजव्या बाजूला लिंक ई-मेल आयडीचे बटण असेल . त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ई-मेल आयडी टाकू शकता.
  • ईमेल आयडी टाकल्यानंतर त्याच्या खाली असलेल्या Send OTP च्या टॅब वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडीवर 6 अंकी OTP क्रमांक येईल. ओटीपी हा बॉक्स मध्ये भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. आता अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

हे ही वाचा :

वारंवार विचारली जाणारी प्रश्न उत्तरे ( FAQ )

  1. मी पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?

    नवीन पॅन कार्ड अर्ज इंटरनेटद्वारे केला जाऊ शकतो. याशिवाय, पॅन कार्ड डेटामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याची विनंती किंवा पॅन कार्डच्या पुनर्मुद्रणाची ( Reprint request ) विनंती इंटरनेटद्वारे देखील केली जाऊ शकते.

  2. मला 2-3 दिवसात माझे पॅन कार्ड कसे मिळेल?

    पूर्वी, पॅन कार्ड अर्ज सबमिट केल्यानंतर पॅन कार्ड मिळण्यासाठी 15-20 दिवस लागायचे. तथापि, काही बदलांसह आणि पॅन कार्ड फास्ट ट्रॅक प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे, अर्जदाराला आता 48 तास किंवा दोन दिवसांत पॅन कार्ड मिळू शकेल.’

  3. पॅन कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

    मतदार ओळखपत्र.
    पासपोर्ट.
    आधार कार्ड.
    अर्जदाराचा फोटो असलेले शिधापत्रिका.
    चालक परवाना.
    फोटो ओळखपत्र जे केंद्र सरकार असेल

  4. तुम्हाला (Instant Pan Card) पॅन क्रमांक आवश्यक असेल तर कसे मिळवायचे ?

    ई-फायलिंग पोर्टलच्या होमपेज वर जा, Instant ई-पॅन वर क्लिक करा. आणि त्यानंतर ई-पॅन च्या पेज वर जा आणि नवीन ई-पॅन मिळवा क्लिक करा.

  5. आधारद्वारे झटपट ई-पॅनसाठी कोण अर्ज करू शकतो?

    पॅन अर्जदार ज्यांच्याकडे UIDAI कडून आधार क्रमांक आहे आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केला आहे ते त्वरित ई-पॅनसाठी अर्ज करू शकतात.

  6. पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज मोफत करू शकतो का?

    हो

  7. आधारवरून पॅन क्रमांक मिळू शकतो का?

    प्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in/home साइटला भेट द्या. यानंतर क्विक लिंक्स अंतर्गत डाव्या बाजूला प्रदान केलेल्या आधारद्वारे झटपट पॅन (Instant E-Pan )या टॅब वर क्लिक करा. आणि नवीन पॅन मिळवा चिन्हावर क्लिक करा.

  8. पॅन कार्डशिवाय शून्य शिल्लक ( Zero Balance account ) खाते उघडू शकतो का?

    तुम्ही पॅनकार्डशिवाय बँक खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 60 वापरू शकता.

  9. पॅन कार्ड का आवश्यक आहे?

    आजच्या जगात बँकेशी संबंधित कोणत्याही कामात व्यवहाराशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे

  10. मी एकापेक्षा जास्त पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो का?

    नाही

  11. पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज प्रक्रियेत कोणत्या पायऱ्या आहेत?

    तुम्हाला तुमचे पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींमध्ये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा लेख पाहू शकता आणि इतर लोंकाना ही माहिती देऊन मदत करू शकता

  12. पॅन कार्डची उपयोग काय आहे ?

    पॅन विभागाला करनिर्धारणाचे सर्व व्यवहार विभागाशी जोडण्यास सक्षम करते. या व्यवहारांमध्ये कर भरणे, TDS/TCS क्रेडिट्स, उत्पन्नाचा परतावा, निर्दिष्ट व्यवहार, पत्रव्यवहार इत्यादींचा समावेश आहे. हे करदात्याची माहिती सहज मिळवणे आणि विविध गुंतवणूक, कर्जे आणि करनिर्धारणाच्या इतर व्यावसायिक क्रियाकलापांची जुळणी करणे सुलभ करते.

  13. कोणत्या व्यक्तींनी पॅन मिळायला पाहिजे?

    प्रत्येक व्यक्तीचे एकूण उत्पन्न किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे एकूण उत्पन्न ज्याच्या संदर्भात तो मागील वर्षात आकारणीयोग्य आहे त्या कमाल रकमेपेक्षा जास्त असेल ज्यावर कर आकारला जात नाही.
    एक धर्मादाय ट्रस्ट ज्याने कलम 1​39(4A) अंतर्गत परतावा देणे आवश्यक आहे.
    प्रत्येक व्यक्ती जो कोणताही व्यवसाय किंवा व्यवसाय करत आहे ज्याची एकूण विक्री, उलाढाल किंवा एकूण पावत्या मागील कोणत्याही वर्षात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
    प्रत्येक व्यक्ती जो विशिष्ट आर्थिक व्यवहारांमध्ये प्रवेश करू इच्छितो ज्यामध्ये पॅन कोट करणे अनिवार्य आहे.

  14. पॅन कार्ड का महत्वाचे आहे?

    आयकर विभागासोबत प्रत्येक व्यवहारासाठी कायमस्वरूपी खाते क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. बँक खाते उघडणे, बँक खाते, बँक खात्यात रोख रक्कम जमा करणे, डिमॅट खाते उघडणे, स्थावर मालमत्तेचे व्यवहार, रोख्यांमध्ये व्यवहार करणे इत्यादी अनेक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

Leave a Comment