PM Kisan Yojana Registration 2023 | Pmkisan.gov.in | पीएम किसान सम्मान निधि योजना मराठी

PM Kisan Yojana । पीएम किसान योजना | पीएम किसान सन्मान निधी योजना | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता, कागदपत्रे  । प्रधानमंत्री किसान योजना E-Kyc |PM Kisan beneficiary list village wise | पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी तपासायची?। पीएम सम्मान निधी योजना 2023 लाभार्थी स्थिती ।PM Kisan Login । पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?

PM Kisan Yojana Registration 2023

आपल्याला माहिती आहे की, PM Kisan Samman Nidhi योजना चालू आहे आणि अनेक लाभार्थी त्याचा लाभ घेत आहेत. जर तुमच्यापैकी कोणी अद्याप योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर कृपया PM किसान नोंदणी 2023 करा आणि नंतर लाभ मिळण्यास सुरुवात करा. शिवाय, नोंदणी प्रक्रियेला जाण्यापूर्वी तुम्ही या योजनेची पात्रता तपासली पाहिजे. तसेच आवश्यक कागदपत्रांची नोंद करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोंदणी करताना काळजी करण्याची गरज नाही.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ₹ 6000 ची रक्कम दिली जाते. 6000 रुपयांची ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच दिला जातो. मात्र, जर शेतकरी करदाता असेल तर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ दिला जात नाही.

PM Kisan Yojana

पीएम किसान सन्मान निधी योजना ठळक मुद्दे

योजनेचे नावपीएम किसान सन्मान निधी योजना
योजनेचा प्रकारकेंद्र सरकार
घोषणा कधी केली1 डिसेंबर 2018
कधी सुरु झाली24 फेब्रुवारी 2019
विभागकृषी सहकार व शेती कल्याण विभाग
लाभ6000 रुपये प्रति वर्षे 3 सामान हप्त्यांमध्ये
Budget75000/- crore
हेल्पलाईन नंबर 155261 /011-24303600
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
पीएम किसान योजना वार्षिक हप्ता कधी जारी केला जातो?

पहिला हप्ता- एप्रिल-जुलै
दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर
तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च

पीएम किसान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • नागरिकत्व प्रमाणपत्र
 • बँक खात्याची माहिती
 • जमीनधारक कागदपत्र (7/12)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता खालील प्रमाणे: PM Kisan Yojana Eligibility

 • सरकारच्या माहिती मध्ये शेतकरी किंवा जमीन मालकाचे नाव असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ. मूलभूत कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे भूमी अभिलेख (7/12) असणे आवश्यक आहे.
 • पीएम किसान योजनेचे फायदे मिळविण्यासाठी नागरिकत्व प्रमाणपत्र, जमीन मालकीची कागदपत्रे,आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही?

 • शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती कर भरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा फायदा मिळत नाही.
 • ज्यांच्याकडे स्वत:च्या नावावर शेतजमीन नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
 • शेतजमीन नावावर असूनही एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर तिला या योजनेचे लाभ मिळत नाही.
 • नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्डट अकाऊटंट यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
 • एखाद्या शेतकऱ्याला वर्षाला दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

पीएम किसान योजनेचा फायदा कोणाकोणाला होतो?

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टर जमीन आहे आणि ज्यांचे वय 18 वर्षे-40वर्षे असेल अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे आणि ती शेती बागायती असणे म्हणजे त्यात पीक येत असलेली जमीन हवी तेव्हाच या योजनेचा लाभ होणार आहे.

पीएम किसान योजना नोंदणी कशी करावी?

 • प्रथम पीएम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळ भेट दिली पाहिजे.
 • यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणीचा (Farmers Corner) टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
 • यानंतर त्या टॅबवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी प्रकार विचारला जाईल.
 • तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर ग्रामीण शेतकरी नोंदणी निवड आणि शहरी भागातील असल्यास शहरी शेतकरी नोंदणी असे निवडा.
 • याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून आता पूर्ण फॉर्म चा तपशील आधार नंबर, मोबाईल नंबर, राज्य, कॅपचा कोड भरा.
 • तुम्हाला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो भरा अशाप्रकारे तुम्ही नवीन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान नोंदणी 2023 पूर्ण करू शकता.

पीएम किसान योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

 • सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर भेट द्या.
 • त्या होमी पेज च्या उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
 • त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.
 • आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाइल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.
 • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला तुमचे नाव मिळेल.

पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी तपासायची? How to Check PM Kisan Yojana Beneficiary List?

 • प्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
 • यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
 • Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
 • लाभार्थी यादीवर क्लिक केल्यावर , तुम्हाला काही पर्याय दिसतील जिथे तुम्हाला तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल.
 • तुम्ही तुमचे गाव निवडताच आणि Get Data वर क्लिक करताच, तुमच्या गावात उपस्थित असलेले सर्व शेतकरी जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र आहेत , त्या लोकांची नावे दिसतील.

PM Kisan Yojana

पीएम सम्मान निधी योजना 2023 लाभार्थी स्थिती कशी तपासायची?

पीएम सम्मान निधी योजना लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल. प्रथम पीएम किसान सम्मान निधी योजना चा होम पेज https://pmkisan.gov.in ला भेट द्या. त्या नंतर होम पेज वर शेतकरी विभागात लाभार्थी स्थिती ( Beneficiary status ) टॅब वर क्लिक करा. लाभार्थी स्थिती वर क्लिक केल्यावर एक पर्याय निवडा – आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर या तीन पर्याय मधून निवडलेला पर्याय निवडल्यानंतर माहिती मिळवा ( data )वर क्लिक करा. त्या नंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल.

पीएम किसान योजनेचे बँक खाते आणि आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे ही रक्कम त्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते त्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. आधार जोडण्यासाठी काय करायचे ते आता बघू

 • सर्वप्रथम अर्जदाराने जिथे बँक खाते आहे, त्या बँक मध्ये जावे लागेल.
 • अर्जदाराने बँक यामध्ये जाताना आधार कार्ड ची छायांकित प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जावी लागेल.
 • आता तुम्हाला आधार कार्ड च्या कॉपी वर सही करून बँक खाते क्रमांक जोडावा लागेल. आणि हे कागदपत्रे बँकांच्या अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल.
 • त्या नंतर बँकेच्या अधिकारी तूमचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर जोडतील.

पीएम शेतकरी संबंधित समस्यांसाठी येथे संपर्क साधा
तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता. याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल. pmkisan-ict@gov.in वर मेल करूनही शेतकरी त्यांच्या समस्येचे निराकरण करू शकतात.

अधिक माहितीसाठी :

एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे?इथे क्लिक करा
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्ज विषयी माहितीइथे क्लिक करा
IDFC FIRST बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे?इथे क्लिक करा
पीएम किसान सन्मान योजना यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे?इथे क्लिक करा
जननी सुरक्षा योजना मराठी माहितीइथे क्लिक करा

Leave a Comment