सुकन्या समृद्धी योजना मराठी 2022 -Sukanya Samridhi Yojana

Sukanya Samridhi Yojana।Sukanya Samridhi Yojana in Marathi।सुकन्या समृद्धी योजना मराठी।Sukanya Samridhi Yojana Maharashtra।सुकन्या योजना नवीन अपडेट।सुकन्या समृद्धी योजना काय आहे?।Sukanya Samriddhi Yojana Objectives।सुकन्या समृद्धी योजना व्याज दर । सुकन्या समृद्धि योजना पोस्ट ऑफिस।सुकन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे।सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आणि तोटे।सुकन्या समृद्धी योजनेसाठी अधिकृत बँका।Sukanya Samriddhi Yojana Calculator

केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी ही योजना सुरु करण्यात आली. ही भारत सरकारची एक अल्प बचत योजना आहे जी केवळ मुलींसाठी आहे. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही सर्वोत्तम योजना आहे. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते असेही म्हंटले जाते.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना मराठी 2022:

सुकन्या समृद्धी योजना लहान गुतंवणूक योजनेच्या श्रेणीत येते. तिचा मुख्य उद्देश मुलींच्या भविष्यासाठी पालकांनी केलेली बचत आहे. ज्यांना आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या शिक्षणासाठी किमान 250 रुपये ठेव रकमेसह सुरवात करू शकता.यापूर्वी ही रक्कम 1 हजार रुपये होती. सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम 1.5लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.

या योजनेत पैसे गुंतवल्याने तुम्हाला आयकर वाचविण्यासही मदत होते. पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत व्यावसायिक बँकांमध्ये मुलीच्या नावाने (जे निवासी भारतीय नागरिक आहे) फक्त एकच खाते उघडले जाऊ शकते. या नियमांखालील खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी सामान्य परिस्थितीत उघडले जाईल.

सुकन्या योजने अंतर्गत खाते उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा 18 वर्ष नंतर लग्न होईपर्यंत ते चालवले जाऊ शकते या योजनेच्या नवीन नियमानुसार केवळ मूळ भारतातील रहिवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर अशी मुलगी ही सुकन्या समृद्धी योजना पूर्ण होण्यापूर्वी भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू लागली तर अशा परिस्थितीत ती मुलगी या योजनेपासून वंचित राहणार. या योजनेच्या नवीन नियमानुसार महिनाभरात मुलीची निवासी स्थान बदले तर पालकांना माहिती द्यावी लागते.

सुकन्या समृद्धी योजना [ नवीन अपडेट ] :

  • आधी एका परिवारातील फक्त 2 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा 80C अंतर्गत कर लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • पूर्वी मुलगी वयाच्या दहाव्या वर्षी स्वत: खाते चालवू शकत होती, परंतु आता वयाच्या अठराव्या वर्षी ते करणे बंधनकारक आहे.
  • यापूर्वी मुलीच्या अकाली मृत्यूमुळे खातेही बंद करण्यात येत होते. मात्र आता यामध्येही बदल करण्यात येणार आहेत.

महत्वाची माहिती : 80C अंतर्गत जर तुम्ही PPF मध्ये 1.5 लाख रुपये आणि 1.5 लाख रुपये स्वतंत्रपणे ( FD , Sukanya Yojana) गुंतवले असतील, म्हणजे तुम्ही एकूण 3 लाख रुपये गुंतवले असतील, तर फक्त 1.5 लाखांवरच करमुक्त व्याज मिळेल.1.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करणे शक्य नाही.

सुकन्या समृद्धी योजना मराठी 2022:

योजनेचे नावअल्प बचत योजना
योजनेची सुरवात22 जानेवारी 2015
खाते उघडण्याचे वय0 ते 10 वर्षे
खात्यात जमा करण्यासाठी रक्कम किमानकिमान 250 रु.जास्तीस्त जास्त 1.5 लाख ( एका वर्षात )
व्याज दर7.6%
हे खाते कोण उघडू शकतेमुलीचे पालक
खाते परिपक्वता21
किती खाती उघडू शकतातजास्तीत जास्त दोन मुली (दोन मुली जुळे असताना तीन खाती)

काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?

सुकन्या समृद्धी योजना म्हणजे हि एक लहान बचत योजना आहे. जी 22 जानेवारी 2015 रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरु केली या योजनेअंतर्गत मुलींची बचत खाती उघडली जाते.ज्यामध्ये 250 रु ते 1.5 लाख रुपयांची रक्कम जमा करता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचे उद्देश
Sukanya Samridhi Yojana Purpose

  • केंद्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट्य देशातील मुलींचे उज्वल भविष्य करणे आहे.
  • मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
  • मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणि भविष्यात सन्मानाने जगता या या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Sukanya Samridhi Yojana Benefits

  • आयकर कायद्या 1961च्या कलम 80C अंतर्गत आयकर कपातीसाठी पात्र आहेत. सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम आणि मिळणारे व्याज करपात्र नाही.
  • इतर मुदत ठेव योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो.
  • सुकन्या योजनेत कमीत कमी 250रुपये ते 1.5 लाख रुपये वार्षिक ठेव म्हणून ठेऊ शकतो.
  • सुकन्या योजना कोणत्याही बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सहज सुरु करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे नुकसान
Sukanya Samridhi Yojana Disadvantages

  • सुकन्या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21वर्षाचा असतो.
  • या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही
  • या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी
Sukanya Samridhi Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ फक्त त्या मुलींनाच मिळणार आहे ज्यांचा जन्म भारतात झाला आहे आणि ज्या कायम भारतात राहत आहेत. जे भारताबाहेर राहतात किंवा अनिवासी भारतीय आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्यांच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे, फक्त तेच पालक त्यात खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त 10 वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
  • मुलीचे वय 21वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट( DD ), चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम (CBS)
    आणि online transfer अशा पद्धतीने पैसे भरता येतात

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Sukanya Samridhi Yojana Documents Required

  • या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी वय 10 वर्षापेक्षा कमी असावे.
  • अर्ज
  • आधार कार्ड
  • मुलीचा जन्म दाखला
  • फोटोग्राफ ( मुलीचा आणि पालकांचा फोटो )
  • पालकाची ओळख आणि पत्ता पुरावा
  • जन्माच्या एकाच क्रमाने अनेक मुलींच्या जन्माच्या बाबतीत, त्याच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पोस्ट ऑफिस किंवा बँकांना आवश्यक असलेली इतर कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजनेचे जुने व्याजदर

कालावधीव्याजदर RATE (%)
3 डिसेंबर 2014 पासून9.1%
1 एप्रिल 2015 पासून9.2%
1 एप्रिल 2016 पासून8.6%
1ऑक्टोबर 2016 पासून8.5%
1 एप्रिल 2017 पासून8.4%
1 जून 2017 पासून8.3%
1 जानेवारी 2018 पासून8.1%
1 ऑक्टोबर 2018 पासून8.5%
1 जुलै 2019 पासून8.4%
1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2022 पर्यंत7.6%

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर
Sukanya Samridhi Yojana Interest Rate

सुकन्या योजना व्याजदर 7.6%
गुतंवणूक रक्कम किमान 250 रु.जास्तीस्त जास्त 1.5 लाख
परिपक्वता रक्कम गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असेल.
परिपक्वता कालावधी 21 years

सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रकारे केले जाते.
Sukanya Samridhi Yojana Calculator

SSY खात्याचे व्याज कॅलेंडर महिन्यासाठी सर्वात कमी शिल्लक रकमेवर मोजले जाते, म्हणजे महिन्याच्या पाचव्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटी. व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी एकदाच जमा केले जाते.

उदा. सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 5000/- रुपये गुंतवणूक केल्यास 15वर्षांनी 7.6% व्याज दराने 141610/-(चक्रवाढ पद्धतीने) इतकी रक्कम मिळेल. आणि 21 वर्षाला एकूण रक्कम 258840/- रुपये मिळतील.

तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला २१ वर्षानंतर मिळेल.

वर्षप्रारंभिक शिल्लकव्याजदरवार्षिक ठेव रक्कमव्याज 7.6% दरानेअंतिम शिल्लक
107.6%50003805380
253807.6%500078911169
3111697.6%5000122917398
4173987.6%5000170224100
5241007.6%5000221231312
6313127.6%5000276039071
7390717.6%5000334947421
8474217.6%5000398456405
9564057.6%5000466766071
10660717.6%5000540176473
11764737.6%5000619287665
12876657.6%5000704399707
13997077.6%50007958112665
141126657.6%50008943126607
151266077.6%500010002141610
161416107.6%500011142157752
171577527.6%500012369175121
181751217.6%500013689193810
191938107.6%500015110213920
202139207.6%500016638235558
212355587.6%500018282258840

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी
Sukanya Samridhi Yojana Bank List

खालीलीपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.

  • अलाहाबाद बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • अॅक्सिस बँक
  • आंध्र बँक
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • बँक ऑफ इंडिया
  • कॉर्पोरेशन बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • कॅनरा बँक
  • देना बँक
  • बँक ऑफ बडॊदा
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  • इंडियन ओव्हरसीज बँक
  • इंडियन बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • आय डी बी आय बँक
  • आयसीआयसीआय बँक
  • सिंडिकेट बँक
  • स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
  • ओरिएटल बँक ऑफ कॉमर्स
  • स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
  • पंजाब आणि सिंध बँक
  • युनाटेड बँक ऑफ इंडिया
  • विजया बँक
  • युको बँक

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत
Sukanya Samridhi Yojana Application Process

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत सहाय्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज बँकेत जमा करावी.
  • बँकेकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँक मधून तुमचे SSY खाते उघडल्यानंतर एक पासबुक जारी केले जाईल.
  • अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत.
Sukanya Samridhi Yojana Registration By Post Office

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सुकन्या योजनेसाठी सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.
  • अर्जासोबत सहाय्यक कागदपत्रे आणि पुरावे जोडा.
  • पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
  • प्रारंभिक ठेव रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट म्हणून भरा.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून तुमचे SSY खाते उघडल्यानंतर एक पासबुक जारी केले जाईल.
  • अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजना कशी पोस्ट ऑफिस ते बँक मध्ये हस्तांतरित करावी?
SSY खाते पोस्ट ऑफिस मधून बँकेत हस्तांतरित करण्यासाठी, खालील प्रमाणे सूचनांचे अनुसरण करा

  • खाते असलेल्या पोस्ट ऑफिस शाखेला भेट द्या. मुलीला पोस्ट ऑफिस ला भेट देण्याची गरज नाही कारण पालक प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
  • SSY खाते हस्तांतरित करण्याच्या तुमच्या हेतूबद्दल पोस्ट ऑफिस च्या अधिकाऱ्याला कळवा.
  • योग्यरित्या भरलेला खाते हस्तांतरण फॉर्म, पासबुक आणि केवायसी कागदपत्रे सबमिट करा. तुमच्या विनंतीवरून कार्यकारी खाते बंद करेल.
  • आता, ज्या बँकेच्या शाखेत तुम्हाला SSY खाते ठेवायचे आहे त्या शाखेला भेट द्या.
  • पोस्ट ऑफिस च्या अधिकाऱ्याने तुम्हाला दिलेली KYC कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे त्यांच्याकडे खाते चालू ठेवण्याची विनंती करताना सबमिट करा.
  • एकदा बँक कार्यकारी तुमच्या विनंतीवर प्रक्रिया केल्यानंतर, एक नवीन पासबुक तुम्हाला दिले जाईल.

सुकन्या योजनेसाठी ऑनलाइन पैसे कसे द्यावे?

  • तुमच्या मोबाईल फोनवर IPBB (India Post Payments Bank) अँप डाउनलोड करा.
  • तुमच्या बँक खात्यातून तुमच्या IPBB खात्यात पैसे ट्रान्सफर करा.
  • यानंतर तुमच्या IPBB खात्यात लॉग इन करा आणि DOP (Department of Post)Product अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना निवडा.
  • तुमचा सुकन्या योजनेचा खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी भरा.
  • तुम्हाला द्यायची असलेली रक्कम आणि हप्त्याचा कालावधी निवडा.
  • यांनतर पेमेंट सेट केल्यावर IPBB तुम्हाला त्याबद्दल सूचित करेल.
  • प्रत्येक वेळी तुमच्या IPBB खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील तेव्हा तुम्हाला त्याची सूचना दिली जाईल.

खालील परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करता येईल
Sukanya Samridhi Yojana Discontinued

  • सुकन्या समृद्धी खाते उघडून 5वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
  • लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
  • लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

  1. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?

    250/- रुपये

  2. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?

    1.5लाख रुपये

  3. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे?

    21वर्षे

  4. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर्ज घेता येते का?

    नाही

  5. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास किती दंड आकारला जातो?

    50 रुपये

  6. सुकन्या समृद्धी योजनेमधून जमा पैसे कधी काढता येतात?

    वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर सदर रकमेतून फक्त ५० टक्के रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी शिल्लक काढता येईल.

  7. सुकन्या समृद्धी 2020 मध्ये व्याजदर किती आहे?

    7.6%

  8. सुकन्या समृद्धी खाते कसे उघडता येईल?

    तुम्हाला भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत अर्ज करावा लागेल आणि तुमचे खाते सुकन्या योजनेसाठी उघडले जाईल

  9. पालक किंवा कायदेशीर पालकाचा मृत्यू झाल्यास काय होईल?

    पालक किंवा कायदेशीर पालकाच्या मृत्यूनंतर, मृत्यू प्रमाणपत्रासारखी वैध कागदपत्रे तयार केल्यावर खाते बंद केले जाईल. आणि परिपक्वतेचा लाभ मुलीला दिला जाईल.

  10. सुकन्या समृद्धी खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत हस्तांतरित केले जाऊ शकते?

    होय. जर तुमचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून उघडले असेल तर तुम्ही ते भारतातील कोणत्याही अधिकृत बँकेत हस्तांतरित करू शकता. ते हस्तांतरित कसे करायचे याची पूर्ण माहिती लेखात दिली आहे.

Leave a Comment